विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 23 फेब्राुवारीलाएक्केचाळीसावा दीक्षांत समारंभानिमित्त विद्यापीठ परिसरात तात्पुरते फोटो स्टुडिओ स्टॉलसाठी अर्ज आमंत्रित

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा एक्केचाळीसावा दीक्षांत समारंभ दि. 23 फेब्राुवारी, 2025 रोजी विद्यापीठ परिसरात संपन्न होत आहे. या समारंभाच्या निमित्ताने पदवीकांक्षी विद्याथ्र्यांना पदवी ससन्मान प्रदान केली जाते. पदवी मिळाल्यानंतर फोटो काढण्याची विद्याथ्र्र्यांंना सोय व्हावी, यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठ परिसरातच ज्या फोटो स्टुडिओधारकांना पदवीधारकांचे फोटो काढण्यासाठी स्टुडिओ उभारावयाचे असतील, त्यांना नाममात्र 101/- रूपये शुल्कासह विद्यापीठ परिसरातच विशिष्ट जागा उपलब्ध करून देण्यात येईल, इतर व्यवस्था मात्र संबंधित फोटो स्टुडिओधारकांना करावयाची आहे.
ईच्छुक स्टुडिओधारकांनी दि. 17 फेब्राुवारी, 2024 पर्यंत जनसंपर्क अधिकारी यांचेशी जनसंपर्क विभागात संपर्क साधून आपले अर्ज सादर करावेत, यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दि. 21 फेब्राुवारी, 2025 रोजी दु. 1.00 वाजता जनसंपर्क विभागामध्ये प्लॉटची ई·ारचिठ्ठी काढण्यात येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.