LIVE STREAM

Crime NewsLatest NewsVidarbh Samachar

स्कूल व्हॅन चालकाचे चिमुकलीसोबत गैरकृत्य, पालकांची पोलिसांकडे तक्रार

भंडारा :- विद्यार्थ्यांना घेण्यासाठी स्कूल व्हॅन घरी पोहचली. व्हॅन चालकासोबत थोरली बहीण आणि धाकटा भाऊ शाळेला जायला निघाले. मात्र व्हॅन चालकाने लहान भावास मागे आणि मोठ्या बहिणीला समोरच्या सीटवर बसण्यास सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने चिमुकली सोबत गैरकृत्य केले. मुलगी रडत रडत घरी आली. आईने विचारल्यावर मुलीने तिच्यासोबत चालकाने केलेल्या गैरकृत्याची माहिती दिली. आई -वडिलांनी भंडारा पोलीस ठाण्यात व्हॅन चालकाविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी व्हॅन चालकाविरोधत पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. व्हॅन चालक फरार आहे.

स्थानिक रॉयल पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका १० वर्षीय चिमुकलीसोबत वरील प्रकार शनिवारी दुपारी घडला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी शाळेतून रडत-रडत आली. व्हॅन चालक सुभाष फत्तुजी नेवारे (वय-३५ वर्षे, रा. विद्या नगर भंडारा) १ जानेवारी रोजी सकाळी ८:४५ वाजता मुलांना शाळेत नेण्यासाठी घरी आला. मुलीला त्याच्या समोरच्या सीटवर बसवले. घरापासुन काही अंतर पुढे गेल्यावर व मुलीच्या लहान भावाला व्हॅनच्या मागील सीटवर बसण्यास सांगितले. समोर कुणी नसल्याचा फायदा घेत चालक सुभाष नेवारे याने मुलीला स्पर्श करण्यास सूरवात केली. मुलीने त्याला नकार दिला परंतु तो तसेच करत होता.

मुलीचे वडील घरी परत आल्यावर वरील सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानी व्हॅन मालक कोमल शेंडे याला फोन करून चालक सुभाष नेवारे यांने केलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितले. सुभाष मुलीची छेड काढतो, नको तिथे स्पर्श करित असतो असे सांगितले. तेव्हा शेंडे याने ” ठिक आहे मी त्याला पाहतो” असे सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!