अचलपूर नगरपालिकेवर भव्य मोर्चा – विविध मागण्यांसाठी नागरिकांचा आवाज

अचलपूर :-अचलपूरमध्ये नगरपालिकेवर 5 फेब्रुवारी रोजी एक भव्य मोर्चा काढला जाणार आहे, ज्यामध्ये नागरिक विविध मागण्यांसाठी एकत्र येतील. मोर्चाचे नेतृत्व अचलपूर नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब वानखडे करणार आहेत.
अचलपूर नगरपालिकेचे प्रशासन भोंगळ कारभारामुळे नागरिकांची धास्ती वाढली आहे. घरकुल, विस्कळीत झालेली शिक्षण सेवा, अस्वच्छता आणि नगरपालिकेच्या कामकाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत बाळासाहेब वानखडे यांनी 5 फेब्रुवारी रोजी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. गेल्या सात वर्षांपासून अचलपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्याने प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे, ज्यामुळे समस्यांचा विस्फोट झाला आहे.
नागरिकांच्या या आव्हानावर प्रशासन काय प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 5 फेब्रुवारीच्या मोर्चानंतर अचलपूर शहरातील परिस्थिती बदलते का, यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.