Crime NewsLatest NewsNagpur
दहावीची परीक्षा जवळ असताना अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर क्राइम :- बातमी नागपूरच्या क्राइम जगतातून, अभ्यासाच्या तणावातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरज्योतीनगर परिसरात घडली. प्रणव किरणकुमार बोरकर असे मृताचे नाव असुन पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अभ्यासाच्या तणावातून प्रणव ने घळफास घेतल्याचा अंदाज आहे.
याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अभ्यासाला घेवून विद्यार्थ्यानी डिप्रेशन मध्ये जाऊन असे पावूल उचलणे अतिशय चुकीचे आहे, मात्र वाढत्या स्पर्धा आणि मुलांचे त्याला घेऊन वाढते टेंशन बघता पालकांनी मुलांशी संवाद साधने, त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे, जेणे करून मूल असे टोकाचे पावून उचलणार नाही, अशाच अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज.