भारतातील पहिली केस, ३ दिवसाच्या बाळाच्या पोटातून निघाले दोन जुळे मृत अर्भक

अमरावती :- नमस्कार, आपला पाहत आहातसिटी न्यूज आणि आता एक अत्यंत आश्चर्यकारक आणि मोठी बातमी. बुलढाणा जिल्ह्यातील एका नवजात बाळाच्या पोटात दुसऱ्या गर्भाच्या अस्तित्वाची माहिती समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर संबंधित बाळाला अमरावतीच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तीन दिवसांच्या बाळावर डॉक्टरांच्या तज्ञ टीमने दीड तासांची शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातून दोन मृत अर्भक बाहेर काढले. चला, आता जाणून घेऊया याबाबत अधिक सविस्तर विवरण
“बुलढाण्याच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या नवजात बाळाच्या पोटात गर्भ असल्याची धक्कादायक माहिती एका सोनोग्राफीद्वारे समोर आली. या गर्भाच्या अस्तित्वाचा समज दोन आठवड्यांपूर्वीच डॉक्टरांना झाला होता. बाळाच्या आईच्या पोटात असतानाच बाळाच्या पोटात गर्भाचा शोध डॉक्टरांना लागला. बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला त्वरित अमरावतीच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रेफर केलं. त्यानंतर बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांची एक पथक तयार करण्यात आल. ३ दिवसांच्या बाळावर दीड तास शस्त्रक्रिया केली गेली. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळाच्या पोटातून दोन मृत अर्भक बाहेर काढले गेले. हे अर्भक बाळाच्या पोटात वाढत होते, ज्यामुळे बाळाच्या जीवनाला धोका निर्माण झाला होता.
ही शस्त्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टरांनी पार पडली. डॉ. नवीन चौधरी, डॉ. उषा गजभिये, डॉ. मंगेश मेंढे आणि त्यांच्या टीमने एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया केली. एकूण दहा ते बारा डॉक्टरांच्या टीमने पॅथॉलॉजिकल आणि सर्जिकल प्रक्रियांच्या विविध पैलूवर काम केलं, आणि बाळाची जीवनरक्षक शस्त्रक्रिया यशस्वी केली. अमरावतीतील या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकाराची शस्त्रक्रिया ही पहिल्यांदाच पार पडली. डॉक्टरांनी या जटिल शस्त्रक्रियेसाठी दिलेले प्रयत्न व समर्पण हे एक चॅलेंज म्हणून घेतले होते. त्यांनी अपार मेहनत घेत बाळाचा जीव वाचवला आणि त्याच्या पोटातील मृत अर्भक बाहेर काढले.” या घटनेची संपूर्ण देशात चर्चा होते आहे, आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमचे ही कौतुक केले जात आहे.
या अद्वितीय शस्त्रक्रियेच्या यशस्वी पार पडलेल्या घटनेने संपूर्ण वैद्यकीय जगतात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे बाळाचा जीव वाचला आणि त्याच्या पोटातील मृत अर्भक यशस्वीपणे बाहेर काढले. या घडामोडीवर संपूर्ण डॉक्टरांची टीमचे अभिनंदन केले जात आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बघत रहा सिटी न्यूज