विदर्भवासियांना फेब्रुवारी देणार चटके; पारा ३७ अंशावर

विदर्भ :- मकर संक्रांतीपासून दिवस मोठा व रात्र लहान होत जाते तसेच सूर्याची दाहकता वाढू लागते. याचा अनुभव अकोलाकरांना येऊ लागला असून, फेब्रुवारी महिन्यातच मार्च हिटचे चटके जाणवू लागले आहेत.
सोमवारी अकोल्याचे कमाल तापमान ३७.१ अंशांवर पोहोचले होते. उन्हाची दाहकता वाढल्याने उबदार कपडे कपाटात ठेवले गेले असून, घराघरात पंख्यांचा आहे. वापर सुरु झाला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दुपारी उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. तसेच रात्री तापमानात घट होत असून, थंडी जाणवत आहे. या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
मार्च महिन्यात काय होणार?
अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान सोमवारी ३७.१ अंशांवर होते. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, आताच ३७.१ अंशांवर तापमान गेल्याने मार्च महिन्यात तापमान आणखी वाढून काय स्थिती राहणार, याचा विचार करूनच अंगाला घाम फुटत आहे. मार्च महिनाच तापू लागला, तर मे व जून महिन्यात अंग भाजून निघणार, यात शंका वाटत नाही.
दुकानांमध्ये दिसू लागले कुलर
आता थंडीचा जोर कमी झाला असून, उष्णता वाढू लागल्याने घरोघरी पंख्यांचा वापर वाढला आहे. रात्रीही पंख्याशिवाय झोप येत नाही, अशी स्थिती आतापासूनच निर्माण झाली आहे. अशात आता दुकानांमध्येही विक्रीसाठी कुलर दिसू लागले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात मागच्या दहा वर्षांतील कमाल तापमान
२०१५ – ३७.५
२०१६ – ३८.४
२०१७ – ३९.३
२०१८ – निरंक
२०१९ – ३९.२
२०२० – ३६.६
२०२१ – २८.२ २
०२२ – ३७.८ २
०२३ – ३८.५
२०२४ – ३६.९