Budget मध्ये करात नाही कपात, सोने-चांदीचा आता काय भाव ?

Budget 2025 मध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळाला. बजेटवर शेअर बाजाराने नाराजी जाहीर केली. त्यानंतर विविध क्षेत्रात बजेटवर काय प्रतिक्रिया येते, विशेषतः सोने आणि चांदीचा बाजार काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला. शनिवार आणि रविवार आल्याने बुलियन मार्केटच्या प्रमुख संस्थांनी किंमती जाहीर केल्या नाहीत. सोमवारी दोन्ही धातुच्या किंमती जाहीर झाल्या. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत.
सोन्याचा दिलासा
गेल्या महिन्याने सोन्याने 6 हजारांची दरवाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात 500 रुपयांनी किंमती उतरल्या तर जवळपास 2500 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर सोमवारी सोन्याच्या किंमतीत 440 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 77,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तीन दिवसांपासून चांदीत शांतता
गेल्या महिन्याच्या अखेरीस चांदीने 3 हजारांची भरारी घेतली. तर त्यापूर्वी चांदीला सूर गवसला नाही. 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. 31 जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. सोमवारी किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.