LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

अल्पवयीन मुलीशी वर्षभर जबरदस्ती शरीरसंबंध, शिंदे गटाच्या नेत्याला १० वर्षांचा तुरुंगवास

लातूर :- राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये उपजिल्हाप्रमुख पदावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अखेर शिक्षा झाली आहे. ज्याच्यामुळे एका अल्पवयीन मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. आरोपी विकास जाधव याला उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

एका अल्पवयीन मुलीची आत्महत्या धमकी प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. इतक्या मोठ्या पदाधिकाऱ्याला शिक्षा लागल्याने पक्षाची प्रतिमा सुद्धा काही अंशी मलीन झाल्यामुळे शिवसैनिकांनी नाराज व्यक्त केली आहे. तीन वर्षांपूर्वी लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिंदे सेना उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याच्या वरती तीन वर्षांपूर्वी गुन्हा नोंद झाला होता. अल्पवयीन मुलीने या प्रकरणात आपली अब्रू वाचवण्यासाठी आत्महत्या केली होती.

विकास उर्फ कल्याण गोविंदराव जाधव 37 वर्षांचा असून उदगीर तालुक्यातील हळी येथील रहिवासी आहे. सुरुवातीपासून वादग्रस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या जाधव शिवसेनेमध्ये काम करत होता. आपले राजकीय वजन वापरून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तो दमदाटी करत असे. त्यातच त्याने एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ही गोष्ट तिच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांना सुद्धा विकास याने जीवेत ठार मारण्याची धमकी दिली. तब्बल एक वर्ष पीडित मुलीशी संबंध ठेवल्यास न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. संबंधित मुलीचे लग्न होणार नाही या भीतीने कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली नाही. मात्र त्याचा फायदा घेऊन तो जोर जबरदस्तीचा प्रयत्न करत होता. विकास जाधवच्या जाचाला कंटाळून अखेर संबंधित मुलीने स्वतःची जीवन यात्रा संपवली. तिने आत्महत्या केल्यानंतर वाढवणा पोलीस ठाण्यामध्ये 3 सप्टेंबर 2020 रोजी 376, 506 आणि 366 या कलमांतर्गत पोस्कोचा गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपीला पोलिसांनी अटक केली. काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. 21 ऑक्टोबर 2020 रोजी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले.2022 ला आरोप निश्चित करून सुनावणीला सुरुवात झाली. प्रत्यक्षदर्शी, पोलीस, तज्ञ, वैद्यकीय, पंच असे एकूण 13 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सोमवारी उदगीर येथील विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. त्यानुसार पीडित मुलीच्या मृत्यू प्रकरणी विकास जाधव याला दोषी ठरवण्यात आले. त्यासाठी दहा वर्ष आणि पाच हजार रुपये रकमेची शिक्षा उठवण्यात आली. हा दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगण्याचे निकाल पत्रकात उल्लेख आहे. त्याचबरोबर धमकी प्रकरणातही आरोपीला दोषी ठरवण्यात आले.

पीडिताच्या मृत्यूमुळे सुटका!

विकास जाधव याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. मात्र पीडित मुलीचा मृत्यू झाल्यामुळे कलम 376 मध्ये संबंधिताची सुटका झाली. मात्र एक वर्ष मृत पीडितेशी त्याचे शारीरिक संबंध होते. असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

जिल्हा नियोजन मंडळाचा ही सदस्य!

विकास जाधव हा लातूर जिल्हा नियोजन मंडळात स्वीकृत सदस्य होता. पक्षाकडून त्याला नामनिर्देशित करण्यात आले होते. त्याच्या नियुक्तीला इतर पदाधिकाऱ्यांचा विरोध होता

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!