Accident NewsLatest NewsVidarbh Samachar
टँकरची हॉटेल आणि पानटपरीला जोरदार धडक, पेट घेतला

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने आलेल्या टँकरने रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल आणि पानटपरीला जबर धडक दिली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. धडकेनंतर काही क्षणांतच टँकरने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
“ही घटना घडली आहे काल रात्री पुसद तालुक्यातील कासोळा येथे. भरधाव वेगाने जात असलेल्या एका टँकरने अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल आणि पानटपरीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की काही वेळातच टँकरने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी हॉटेल आणि पानटपरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.”
“सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहेत. प्रशासनाने या अपघाताची दखल घेतली असून, पुढील चौकशी सुरू आहे.