नागपूरमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी केली अटक

नागपूर :- एक नजर नागपूरच्या बातम्यावर, नागपूर येथील भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. या सामन्याच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू होती, परंतु ऑफलाइन तिकिटांसाठी ग्राउंड बाहेर मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कार्यवाही केली.
नागपूरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सामना 5 फेब्रुवारी रोजी सुरू झाला, सदर सामन्याच्या तिकिटांची ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री सुरू होती, मात्र ऑफलाइन तिकिटांसाठी ग्राउंड बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. सादर परीसातील पोलिस ठाण्याच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दोन व्यक्ती सामन्याच्या तिकिटांची ब्लॅक मार्केटिंग करत आहेत. त्यावर कारवाई करत, पोलिसांनी सदर ठिकाणी भेट दिली आणि दोन आरोपींना अटक केली. आरोपी मनोहर वंजारी (वय 62) आणि राहुल रामटेके (वय 38) हे दोन व्यक्ती 3,000 रुपयांची तिकीट 6,000 रुपयांना, तर 800 रुपयांची तिकीट 2,000 रुपयांनी ब्लॅक मार्केटिंग करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून या तिकिटांची जप्ती केली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात तिकीट जप्त केली आहेत. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. आम्ही आपल्याला अधिक अपडेट्स देत राहू. आणखी बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज