नागपूर गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभागाची कामगिरी, घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, आरोपींना अटक

नागपूर :- एक नजर नागपूरच्या बातम्यावर, नागपूर शहराच्या गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभागाने घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील शक्तीमाता नगर येथे एका घरातून मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यावर पोलीसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आणि मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर शहरातील नंदनवन हद्दीतील शक्तीमाता नगरमध्ये १ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री एका घरात चोरी झाली. फिर्यादी अंकीत दिगांबर फुतेरिया यांचे घर कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सामान लंपास केले. या चोरीत ०२ एचपी गॅस सिलेंडर, ०१ लॅपटॉप, स्मार्ट वॉच, घडयाळे, स्पीकर, ईयरबड्स आणि ४० हजार रुपयांची अॅक्टीव्हा मोपेड गाडी असा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरीची एकूण किंमत अंदाजे १ लाख ४६ हजार ७०० रुपये होती.
“या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि त्यांनी मिळवलेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपींना अटक केली. आरोपी अमोल चंद्रशेखर चापेकर (वय २६) आणि कुणाल धनराज मनगटे (वय ३४) यांनी या चोरीला कबूल केलं आणि याच जोडीला पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत एक वाहन चोरीचा गुन्हाही केला असल्याचं सांगितलं.
“पोलिसांनी आरोपींनी चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये अॅक्टीव्हा गाडी, १५ तोळे चांदीचे दागिने, स्पीकर, ईअरबड्स, ०४ गॅस सिलेंडर आणि एक लॅपटॉप समाविष्ट आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एकूण १ लाख ४८ हजार ९०० रुपये किंमतीचा आहे. “या यशस्वी तपासाच्या पाश्र्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त श्री. रविन्द्रकुमार सिंगल, सहायक आयुक्त श्री. निसार तांबोळी आणि अपर आयुक्त श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर व त्यांचे पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी जलद कार्यवाही करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपींना अटक केली आहे. या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कडक कारवाईसाठी पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत. पुढील तपासासाठी पोलिसांनी त्यांचं काम सुरू ठेवले आहे.”आणखी अपडेट्ससाठी बघत रहा सिटी न्यूज.