नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी यशस्वी कारवाई, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील गुन्ह्याच्या तीन आरोपींना अटक

नागपूर :- एक नजर नागपूरच्या बातम्यावर, नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 03 कडून शांतीनगर, पाचपावली आणि हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी तपास करत आरोपींचा पर्दाफाश केला आहे.
नागपूर शहरात मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. शांतीनगर, पाचपावली, आणि हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट 03 ने महत्वाची कारवाई केली. या गुन्ह्यांच्या तपासा दरम्यान, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींमध्ये श्याम उर्फ काल्या रामजी पुंड (वय 30, इंदिरामाता नगर), पियुष उर्फ गद्दू दीपक निमजे (वय 19, धम्मदीप नगर) आणि एक विधी संघर्ष ग्रस्त बालक (वय 16, विनोबा भावे नगर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि पुढील तपासासाठी शांतीनगर पोलिस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहेत. या कारवाईमुळे या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे आणि पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल जप्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आरोपींनी या गुन्ह्यांची कबूल केली असून पोलिस या माहितीच्या आधारे पूढील तपास करत आहेत.
पोलिसांनी यशस्वी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. यापुढे या प्रकरणातील तपासात आणखी काय माहिती समोर येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जुळून राहा. बघत रहा सिटी न्यूज.