प्रत्येक व्यापार क्षेत्राचा तंत्रज्ञानामुळे विकास – श्री शशिकांत चौधरी

आजघडीला प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून तंत्रज्ञानामुळे व्यापार क्षेत्राचा विकास होत आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते हॅप्पीटर्स.एआय आणि बेबी व्हर्स.एप चे सह-संस्थापक श्री. शशिकांत चौधरी यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन व अमरावती मॅनेजमेंट असोसिएशनच्यावतीने आयोजित 'आयडिएट 2.0' प्री-इन्क्युबेशन फॉर स्टार्टअप कार्यक्रमात विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्रमुख अतिथी म्हणून अमरावती मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री रणजीत बंड, सुमित खंडेलवाल, समित संघई, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री रणजीत बंड यांनी शेती, उद्योगांबाबत विद्याथ्र्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. येत्या 22 फेब्राुवारी रोजी होणा-या भारत कॉन कार्यक्रमाचा विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी विद्याथ्र्यांना केले.
रोजगार देणारे विद्यार्थी विद्यापीठात घडले पाहिजे – कुलसचिव डॉ. अविनाश असनारे
अध्यक्षीय भाषणातून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, रोजगार मागण्याऐवजी रोजगार देणारे विद्यार्थी विद्यापीठातून घडले पाहिजेत आणि कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे सुध्दा हेच ध्यये आहे. विद्यापीठातील विद्यार्थी निश्चितच ज्ञान ग्रहण करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे या कार्यक्रमामधून ज्ञान ग्रहण करुन येणारा काळ विद्याथ्र्यांसाठी सुवर्णमयी काळ असेल आणि हे सत्र सुध्दा विद्याथ्र्यांचा भविष्यकाळ घडविणारे सत्र ठरेल असा वि·ाासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाने नवउद्योजकांना थेट नवोपक्रम, वैयक्तीकरण, मूल्य प्रस्ताव, ग्राहक विभागणी आणि न वापरण्यात आलेल्या संसाधनांचा प्रभावी वापर यासारख्या यशस्वी स्टार्टअपसाठी महत्वाच्या पाच मूलभूत घटकांवर मार्गदर्शन प्रदान केले. श्री शशिकांत चौधरी यांनी यावर विशेष भर दिला.
संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर यांनी सेंटरच्यावतीने आयोजित उपक्रम तसेच उपयोगिता याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन श्री अमोर हिरुळकर यांनी, तर आभार सीए मोहित गणेशानी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ¬ा संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.