स्वच्छता ही सेवा अभियान: विद्यार्थ्यांनी दिला चित्रकला, रांगोळी, निबंधाद्वारे स्वच्छतेचा सकारात्मक संदेश
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज दिनांक ४ फेब्रुवारी,२०२५ रोजी महानगरपालिका मध्य झोन क्रमांक २ राजापेठ अंतर्गत स्वच्छता अभियान प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करुन महानगरपालिका शाळा क्र.८ रामनगर येथील शाळेत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेवर आधारित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केली. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉ.श्वेता बोके, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे यांच्यासह शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रे रेखाटून लोकांना स्वच्छतेबद्दल सकारात्मक संदेश दिला. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी स्वच्छतेवर आधारित रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे सकारात्मक संदेश देणारी रांगोळी बनवून आणि सुंदर चित्रे रंगवून उत्साहाने भाग घेतला. महानगरपालिका शिक्षकांसह अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांनी विद्यार्थी मुलांच्या प्रतिभेचे कौतुक केले आणि महानगरपालिका झोन क्र.२ च्या वतीने प्रोत्साहन म्हणून त्यांना बक्षीस दिले. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांसह, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, अमरावती शहर समन्वयक डॉ.श्वेता बोके, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे व स्वास्थ निरीक्षकांनी सामूहिक स्वच्छतेची शपथ घेतली.
रंगभरण स्पर्धेमध्ये अनन्या संतोष जोंधळे (प्रथम) साक्षी सुनील गवळी (द्वितीय) तेजस शुभम नागवंशी (तृतीय) विजेते ठरले चित्रकला स्पर्धेमध्ये ईश्वरी शिवा ठाकरे (प्रथम )नम्रता आशिष भलावी (द्वितीय) विजेते ठरले. निबंध स्पर्धेमध्ये निधी अतुल गावंडे (प्रथम) धनश्री संतोष जोंधळे (द्वितीय) विजेते ठरले. रांगोळी स्पर्धेमध्ये दिव्या उमेश उईके कप्रथम) अथर्व भोगे (द्वितीय) धनश्री आमटे (तृतीय) विजेते ठरले. अमरावती शहराच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक तसेच झोन क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.राजश्री दाभाडे, आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका मंजुषा कल्हाने यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केजी शिक्षिका प्रीती पिंपळे, प्रियंका जीरापुरे, शिपाई आशिष इसळ तसेच मदतनीस बेबीताई धुर्वे यांचे सहकार्य लाभले.