अंजनगाव सुर्जीमध्ये 1100 बोगस जन्मदाखल्यांचा प्रकार; किरीट सोमय्यांची पोलिसांत तक्रार

अमरावती :- अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून 1100 पेक्षा जास्त बोगस जन्मदाखले दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे! बांग्लादेशी नागरिकत्व घोटाळ्याचा हा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी म्हटले असून, पोलिस ठाण्यात जाऊन 100 लोकांचे पुरावे दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी कधी होणार? आणि दोषींवर कधी कारवाई होणार? बघुया हा विशेष रिपोर्ट.
अंजनगाव सुर्जीमध्ये बोगस जन्मदाखले घोटाळा उघडकीस आला आहे! भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात 100 लोकांचे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत.
सोमय्यांनी केलेल्या दाव्यानुसार, 1100 हून अधिक बनावट जन्मदाखले तहसील कार्यालयामार्फत दिले गेले असून, या प्रकरणात बांग्लादेशी नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्यांनी अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत तातडीने एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची देखील चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी कठोर कारवाईसाठी आग्रह धरला आहे.
तहसील कार्यालयातील अधिकारी, वकील आणि एजंट यांच्या सहभागाने हा मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आणि कठोर कारवाई करण्याचा सुरक्षा यंत्रणांना इशारा देण्यात आला आहे.
“किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर आता या प्रकरणाची चौकशी होणार का? 1100 बनावट जन्मदाखले घोटाळ्यात तहसील कार्यालयातील मोठे अधिकारीही सामील आहेत का? आणि या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावर तुमचे काय मत आहे? आम्हाला कळवा! ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा