Latest NewsNanded
नांदेड: अर्धापूरमधील सत्य गणपती मंदिराजवळ जिवंत स्त्री जातीचे नवजात अभ्रक आढळले

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील सत्य गणपती मंदिरासमोरील उडान पुलाखाली एक जिवंत नवजात स्त्री जातीचे अभ्रक आढळले आहे. या अभ्रकाचे वय दहा ते पंधरा दिवसांच्या आसपास असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेद्वारे नवजात अभ्रकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे. अर्धापूर पोलिस मातेचा शोध घेत आहेत, या संवेदनशील घटनेचा तपास सुरू आहे.