Crime NewsLatest NewsTop Stories
फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटणारी टोळी गजाआड

यवतमाळ :- फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटणारी टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली.साडेचार लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केलाय. भारत फायनान्स कंपनी मध्ये काम करणारे संदेश ढोकणे बचत गटाची वसूली करुन जात असतांना काही अज्ञात इसमांनी त्याला लखमापूर ते कापरा रोडवर अडवून चाकुचा धाक दाखवून त्याच्या जवळील पैशाची बॅग हिसकावून नगदी अडीच लाख चोरून गेले होते. घटनेतील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.