Crime NewsLatest NewsNagpur
मामीनेच भाच्याला फसवलं! मुलासह खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी!

रक्ताच्या नात्यांपेक्षा संपत्ती मोठी झाली की, विश्वासाचाही सौदा होतो! नागपूरच्या जरीपटका परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मामीनेच आपल्या सख्ख्या भाच्याला मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवलं, त्याच्या संपत्तीत गंडा घातला आणि मुलासोबत मिळून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली.
बी नागपूरच्या जरीपटका परिसरात एका संपत्तीच्या वादामुळे रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पीडित राकेश लालवानी यांनी त्यांच्या मामी रेश्मा अमरलाल लीलवानी यांच्याकडून ५६० चौ. फूट घर खरेदी केले.संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतर त्यांनी घराची रजिस्ट्रीही पूर्ण केली.
परंतु जेव्हा राकेश यांनी घर खाली करण्यास सांगितले, तेव्हा मामीने वेगवेगळे बहाणे सुरू केले. सुरुवातीला काही दिवसांची मुदत मागून भाडेकरू म्हणून राहण्याची परवानगी मागितली. यासाठी "लीव अँड लायसन्स एग्रीमेंट" करण्यात आले आणि घरभाडे ८,००० रुपये ठरवण्यात आले. मात्र, ११ महिने पूर्ण झाल्यानंतरही मामी आणि तिचा मुलगा रवि यांनी घर खाली करायला स्पष्ट नकार दिला. त्याउलट, राकेशकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली! जेव्हा राकेश यांनी वारंवार घर खाली करण्याची मागणी केली, तेव्हा त्यांना धमक्या मिळू लागल्या. मामी रेश्मा आणि तिचा मुलगा रवि यांनी घर खाली करण्यास नकार देऊन सरळ-सरळ धाक दाखवायला सुरुवात केली. इतकंच नव्हे, रवि याची पत्नी महक हिनेही अश्लील भाषा वापरून शिवीगाळ केली आणि खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे राकेश लालवानी अत्यंत अस्वस्थ झाले आणि अखेर पोलिसांत धाव घेतली.
"नात्यांमध्ये विश्वासाला तडा जातो, तेव्हा त्याचा गैरफायदा घेतला जातो. संपत्तीच्या वादामुळे भाच्याच्या नशिबी फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि धमक्या आल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, राकेश लालवानी यांना न्याय मिळेल का? मामी आणि तिच्या मुलाला शिक्षा होईल का? या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.