विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत घेण्यात आलेल्या शोधनिबंध लेखन व सादरीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीच्या विकासाला चालना मिळावी, संशोधनात त्यांना लिंगभाव दृष्टिकोनाचा उपयोग करता यावा, तसेच नवीन संशोधक कल्पना आणि त्यांचे उपयोजन यांचा तार्किक पद्धतीने आणि सर्जनशील उपयोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांना यामुळे सहकार्य होऊ शकेल, या दृष्टीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शोधनिबंध लेखन व सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेसाठी स्त्रिया आणि बेरोजगारिता, लिंगभाव संवेदनशीलता विकासातील अडचणी, पुरुषत्त्वाचे पुरुषांवर होणारे परिणाम, स्त्रीवादाविषयी असणाऱ्या गैरसमजांमागील कारणे, ख्र्क्रएच्र्घ्र्क्ष्ॠअ समुदायाच्या जाणीव-जागृतीचे उपाय असे पाच विषय देण्यात आले होते. या शोधनिबंध लेखन व सादरीकरण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता. या स्पर्धेतील आलेल्या शोधनिबंधांचे परीक्षकाकडून परीक्षण करण्यात आले. त्या आधारे तीन क्रमांक निवडण्यात आले आहेत.
या स्पर्धेत दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर, जि. बुलडाणा येथील गजानन ज्ञानेश्वर व्यवहारे यांचा प्रथम क्रमांक आला असून याच महाविद्यालयातील रोहन रामेश्वर अंभोरे यांचा द्वितीय क्रमांक आला. विधी महाविद्यालय, अकोला येथील वृषाली संजय इंदाने यांचा तृतीय क्रमांक आला.शोधनिबंध लेखन व सादरीकरण स्पर्धेतील सर्व क्रमांकांना ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. या शोधनिबंध लेखन व सादरीकरण स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथील सहयोगी प्राध्यापक व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनिता धोपटे यांनी केले.