शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा अमरावती दौरा – शाळांची पाहणी व शैक्षणिक आढावा बैठक

अमरावती :- राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. याबाबत सविस्तर पाहूया…”
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी जिल्ह्यातील सुरवाडी, तिवसा, गुरूकुंज मोझरी आणि महानगरपालिकेच्या शाळांना भेट देत पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक पद्धतीचा आढावा घेतला.
“राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी सुरवाडी, तिवसा, गुरूकुंज मोझरी आणि महानगरपालिकेच्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. शिक्षण मंत्री भुसे यांनी शाळेतील सुविधांची पाहणी केली आणि अध्यापन पद्धतीचा आढावा घेतला. यानंतर, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाचही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांसोबत शैक्षणिक सत्राचा सखोल आढावा घेतला.”
“तर शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा हा दौरा शिक्षण क्षेत्रातील सुधारणा व विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. पाहत राहा city news