“उद्धव ठाकरेंच्या खासदारांची यादी: ६ खासदारांचा सोडण्याचा निर्णय? कोणाची नावं चर्चेत?”

महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होऊ घातला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे. हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतंय. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत हे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतंय. ठाकरेंचे नेमकी कोणते सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार त्यांच्या नावाची सध्या चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश-
ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून होती. मात्र खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं. पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई रोखायची असेल तर 6 खासदारांनी पक्षप्रवेश करणं गरजेचं होतं. त्यामुळे 6 चा आकडा गाठण्यासाठी वेळ घेतला गेला. अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आलं असून पडद्यामागे जुळणी झाल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंच्या खासदारांची यादी-
1) अरविंद सावंत- दक्षिण मुंबई लोकसभा
2) अनिल देसाई- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा
3) संजय दीना पाटील- ईशान्य मुंबई लोकसभा
4) संजय जाधव- परभणी लोकसभा
5) ओम राजेनिंबाळकर- धाराशिव लोकसभा
6) भाऊसाहेब वाकचौरे- शिर्डी लोकसभा
7) राजाभाऊ वाजे- नाशिक लोकसभा
8) संजय देशमुख- यवतमाळ-वाशीम लोकसभा
9) नागेश पाटील-आष्टीकर- हिंगोली लोकसभा
शिवसेना ठाकरे गटाचे आमदारांची यादी :-
1) मेहकर- सिद्धार्थ खरात
2) दर्यापूर – गजानन लवाटे
3) बाळापूर – नितीन देशमुख
4) वणी – संजय देरकर
5) परभणी – राहुल पाटील
6) विक्रोळी – सुनील राऊत
7) जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
8) दिंडोशी – सुनील प्रभू
9) वर्सोवा – हरुन खान
10) कलिना – संजय पोतनीस
11) वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
12) माहीम – महेश सावंत
13) वरळी – आदित्य ठाकरे
14) शिवडी – अजय चौधरी
15) भायखळा – मनोज जामसूतकर
16) खेड आळंदी – बाबाजी काळे
17) उमरगा – प्रवीण स्वामी
18) उस्मानाबाद – कैलास पाटील
19) बार्शी – दिलीप सोपल
20) गुहागर – भास्कर जाधव