नागपूरमध्ये जुगार विरोधी मोठी कारवाई: 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूर शहराच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने एक महत्त्वाची कारवाई केली, ज्यात महाराष्ट्र जुगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी जेरकांड केले असून, त्यांच्याजवळील मुद्देमाल जप्त केले. जाणून घेऊया तपशीलवार माहिती.
“नागपूर शहराच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने भारत व इंग्लंड यांच्यातील क्रिकेट वन डे सामन्यादरम्यान महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत एक मोठी कारवाई केली. बेलतरोड़ी पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत तीन आरोपींची अटक करण्यात आली आहे. आरोपी आकाश महेश हिंदूजा, वय 30 वर्ष, रा. पैंट्री, काली नगर, रायपुर, छत्तीसगढ; नारायण कुमार नंदकिशोर गौंड, वय 22 वर्ष, रा. वार्ड न.6, गोरखपूर, उत्तर प्रदेश आणि आबिद शेख अकलिम शेख, वय 21 वर्ष, रा. सीविल लाईन, रवि नगर, अंबाझरी, नागपूर हे तीन आरोपी क्रिकेट मैचवर जुगार खेळत होते.
या प्रकरणी आरोपींच्या ताब्यातून 2,51,300/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात HP व आसुस कंपनीचे 2 लैपटॉप आणि चार्जर, एक UCN ब्रॉडबॅंड, 9 विविध कंपन्यांचे मल्टीमीडिया मोबाईल आणि 1 कैसियो कंपनीचा कॅल्क्युलेटर यांचा समावेश आहे.
गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून ही रेड कारवाई करण्यात आली. आरोपींच्या अडचणीतून एक मोठी लूट उघडकीस आली असून, त्या आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना बेलतरोडी पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.”
ही होती नागपूरमधील मोठ्या जुगार कारवाईची संपूर्ण माहिती. महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत ही कारवाई महत्त्वाची आहे आणि यामुळे जुगार आणि त्यातील गैरकायदेशीर व्यवहारांविरोधातील सुरक्षा पातळी मजबूत होते. आपल्याला ह्या घटनेसंबंधी पुढील अपडेट्स देऊच, पुढील तपशीलवार बातम्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज.