क्रिकेट मॅचवर जुगार खेळणाऱ्या ३ आरोपींना अटक, २.८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त”

. नागपूर शहराच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 1 पथकाने हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट मॅचवर जुगार खेळणाऱ्यांविरूध्द मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २.८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत जुगार खेळणाऱ्यांविरूध्द ही कारवाई करून गुन्हा नोंदविन्यात आला. पोलिसांनी राजेंद्र रामाजी भानुसे व राजकुमार पितांबर गहाणे या दोघांना अटक केली. हे दोन्ही आरोपी गुमगाव, वार्ड क्र. ४ येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे ४ मोबाईल, एक अल्टो कार, एक हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी आणि १८६० रुपये नगदी मिळाले. एकूण २,८८,८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात समोर आले की आरोपी क्रिकेट मॅचच्या थेट धावफलांवर पैशाची खायवाडी करत होते. “क्रिकेट लाईव्ह लाईन” या ॲपद्वारे २०२५ च्या डेझर्ट वायपर विरुद्ध शारजा मॅचचे थेट धावफल पाहून जुगार खेळला जात होता. तसेच, तिन्ही आरोपींविरूध्द महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. अशी कारवाई जुगाराच्या गैरवर्तनांवर कडक लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरते.