दिवसा अश्लील विनोद, रात्री मोबाईलवर…,वैतागलेल्या नर्सने डॉक्टरांविरोधात केली तक्रार,

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्हा एका रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर नर्ससोबत अश्लील वार्तालाप केल्याचा गंभीर आरोप आहे. या डॉक्टरांवरील हे आरोप महिला नर्सिंग
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्हा एका रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर नर्ससोबत अश्लील वार्तालाप केल्याचा गंभीर आरोप आहे. या डॉक्टरांवरील हे आरोप महिला नर्सिंग ऑफिसरने केले आहेत. पीडित महिला नर्सिंग अधिकाऱ्याच्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी, उच्च अधिकाऱ्यांनी महिला नर्सिंग अधिकाऱ्याला तिच्या पदावरून काढून टाकले. आणि तिला जनरल ड्युटी नर्स बनवले. अखेर आपल्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधात पीडितेने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने आरोग्य अधिकाऱ्यांना फटकारले. पीडितेला नर्सिंग ऑफिसर पदावर पुन्हा नियुक्त करण्यात आले असून, लैंगिक छळ समितीला या प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील महिला नर्सिंग ऑफिसरने दोन वरिष्ठ डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर तिला दुहेरी अर्थ लावणारे आणि आक्षेपार्ह विनोद सांगायचे. बऱ्याच वेळा, ते ड्युटीवर असताना तिच्याशी लगट आणि चुकीचे स्पर्श करायचे. याशिवाय डॉक्टर रात्री तिच्या मोबाईलवर गाणी आणि अश्लिल मॅसेजेस पाठवत. असे महिला नर्सिंग ऑफिसर म्हणाली.
डॉक्टरांविरोधात कारवाई
जेव्हा महिला नर्सिंग ऑफिसरने याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा डॉक्टरांना वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पीडितेला नर्सिंग ऑफिसर पदावरून हटवले. आणि तिला जनरल ड्युटी नर्स बनवले. यानंतर पीडितेने महिला आयोग आणि इतरत्र तक्रार केली. परंतु, जेव्हा डॉक्टरांविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तेव्हा तीने उच्च न्यायालयात धाव घेतली. पीडितेने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे, उच्च न्यायालयाने या प्रकरणात अधिकाऱ्याला फटकारले. आणि पीडितेला ताबडतोब वैद्यकीय अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त करण्याबाबत आदेश दिले. यासोबतच, लैंगिक छळ समितीला या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाने दिले हे निर्देश
पीडितेने सांगितले की, जिल्हा रुग्णालयात तैनात असलेल्या इतर अनेक परिचारिकांना देखील त्रास दिला जात आहे. पण त्यांना त्यांची प्रतिष्ठा आणि नोकरी वाचवण्यासाठी सर्वकाही सहन करावे लागते. काही परिचारिकांनी वरिष्ठांना तक्रारीही केल्या. पण कारवाई करण्याऐवजी त्यांना त्रास देण्यात आला. आणि त्या सर्व घाबरुन गप्प बसल्या.