अमरावतीत उड्डाणपूल बांधकामातील संथगतीवर प्रश्नचिन्ह

अमरावतीतील इतवारा बाजारातील उड्डाणपूलाच्या कामात संथगतीने काम सुरू आहे, आणि नागरिकांना या कामामुळे होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या कामाला ५ वर्षांचा कालावधी उलटला, पण अजूनही काम आधी होत तसंच दिसत आहे.
२०१९ साली सुरू झालेल्या उड्डाणपूलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. पाच वर्षांचा कालावधी उलटला, दोन सरकार आले आणि गेले सुद्धा, तरी पण अजूनसुद्धा उड्डाणपूलाचे बांधकाम जसच्या तसे आहे. विशेषत: असोरिया पेट्रोल पंप पासून चित्रा चौकापर्यंत, आणि काही ठिकाणी बांधकामही नाही.आधी उद्धव ठाकरे सरकार असताना कमला सुरुवात झाली, नंतर शिंदेंचं सरकार आणि आता भाजप सरकार असूनही कामाची गती संथच आहे. अनेक नागरिक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, की सरकार बदलले पण अजून देखील बांधकामाच्या कामात संथ गती कशामुळे आहे?
रस्त्यावर जड वजनाचे लोखंडी साहित्य पसरलेले असल्यामुळे अनेक अपघात होण्याचे धोक्याचे संकेत आहेत. तसेच, रस्ता कच्चा असताना आणि बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना येजा करणे अत्यंत अवघड झाले आहे. खास करून रविवारच्या बाजारपेठेत हजारो नागरिकांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच निर्माण होत आहे. उड्डाणपूलाच्या कामामुळे, भातकुली, दर्यापूर आणि चांदूरबाजार मार्गे जाणारी एसटी बस सेवा बदलली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांची अडचण वाढली आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांना चांगला मार्ग उपलब्ध होत नाही. गावखेड्यातून रविवारच्या बाजारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र या उड्डाणपुलामुळे कमालीचा त्रास होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार असले तरी, रविवारच्या दिवशी एक मजूरही काम करताना दिसत नाही. इतर भागात युद्धपातळीवर कामे सुरू असताना, वलगाव मार्गावरील उड्डाणपूलाचे काम मात्र संथ गतीने होत आहे.
“अमरावतीतील उड्डाणपूलाच्या संथ गतीने काम होणाऱ्या बांधकामावर नागरिकांच्या तक्रारींची शेकडो उदाहरणे समोर आली आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात, आणि सार्वजनिक असुविधा वाढत आहेत. लोकप्रतिनिधींच्या पाहणीच्या प्रमाणावरही कामाची गती सुधारली नाही. सरकारने या कामाला वेग देण्याची गरज आहे,