इंग्लंडने जिंकला टॉस, ‘या’ खेळाडूचं ODI मध्ये पदार्पण, कॅप्टन रोहितने प्लेईंग 11 मध्ये केले 2 बदल

ओडिशाच्या कटक येथील स्टेडियमवर भारत – इंग्लंड दुसरा वनडे सामना खेळवला जात असून टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आलेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना रविवारी पार पडणार आहे. 9 फेब्रुवारी खेळवण्यात येणारा हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. रविवारी 1: 30 वाजता सामन्याला सुरुवात झाली असून यांच्यात झालेला टॉस इंग्लंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. तर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीचे आव्हान मिळाले.
टीम इंडियाने नागपूर येथे झालेला पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभूत करणे शक्य झाले तर टीम इंडिया सीरिजमध्ये विजयी आघाडी घेईल. तसेच इंग्लंडने हा सामना जिंकल्यास ते सीरिजमध्ये भारताच्या बरोबरीला येतील. टॉस झाल्यावर दोन्ही संघाची प्लेईंग 11 जाहीर करण्यात आली. यात कर्णधार रोहित शर्माने प्लेईंग 11 मध्ये दोन बदल केले आहेत.
ओडिशाच्या कटक येथील स्टेडियमवर भारत – इंग्लंड दुसरा वनडे सामना खेळवला जात असून टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आलेत. टी 20 सीरिजमध्ये इंग्लंडला घाम फोडणारा भारतीय गोलंदाज वरूण चक्रवर्ती याचं वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण झालं आहे. इंग्लंड विरुद्ध टी 20 मध्ये वरुणने 14 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याला वनडेतही टेस्ट करण्यासाठी रोहितने संधी दिली असावी. तर पहिल्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला विराट कोहली आता फिट होऊन दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात परतला आहे. तर यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग यांना बेंचवर बसवलं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती