LIVE STREAM

BollywoodLatest News

घरात २ तास झोपतो पण जेलमध्ये चांगली झोप लागली! तुरुंगातल्या दिवसांबद्दल पहिल्यांदाच बोलला सलमान

सलमान खान गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत कार्यरत आहे. त्याने आतापर्यंत चिक्कार हिट चित्रपटही दिले आहेत. तो लोकप्रिय सिनेलेखक सलीम खान यांचा मुलगा आहे, पण सलमानने स्वतःची ओळख निर्माण केली ते स्वतःच्या बळावर….. अलिकडेच सलमानने पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्ट शोमध्ये येऊन आपल्या आयुष्यातील अनुभव शेअर केले. सलमानने खुलासा केला की तो दिवसातून फक्त दोन तास झोपतो. त्याने लोकांना खूप मेहनत करण्याचा सल्लाही दिला. यासोबतच त्याने त्याच्या तुरुंगातील दिवसांबद्दलही बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.
सलमानने सांगितले की तो दिवसातून फक्त दोन तास झोपतो. तो महिन्यातून फक्त एकच दिवस ७-८ तास झोपू शकतो. कधीकधी सेटवर शॉट तयार होत असताना, तो मध्येच काही मिनिटे झोपून घेतो.सलमान २४ तासांत फक्त दिड दोन तासच झोपतो.

सलमानने जीवनात कठोर परिश्रम आणि शिस्तीचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला की सबबी सांगणे हे केवळ यशाच्या मार्गात अडथळा आणते. ‘मी थकलो आहे.’ असे कित्येकदा लोक म्हणतात पण नाही, उठा…कितीही थकला असलात तरी उठा… झोपू नका. काहीतरी असे करा जे तुम्हाला थकवेल आणि मग तुम्ही शांतपणे झोपू शकाल. मी दीड ते दोन तास झोपतो आणि कधीकधी महिन्यातून एकदा मी ७ तास झोपतो.

'मला काहीच काम नसल्याने मी तुरुंगात खूप झोपलो'

सलमान पुढे म्हणाला, ‘कधीकधी मला शूटिंगमध्ये पाच मिनिटांचा ब्रेक मिळतो, त्यामुळे मी खुर्चीतच झोपतो.’ अशी जागा जिथे मी काहीही करू शकत नाही…जसे की मी तुरुंगात असताना खूप झोपायचो कारण तिथे मी काहीही करू शकत नव्हतो. विमान प्रवासात गोंधळ असतो तेव्हापण मी शांतपणे झोपू शकतो कारण माझ्याकडे तिथे करण्यासारखे काहीही नसते. म्हणून जेव्हा कुटुंबाचा किंवा कामाचा विचार येतो तेव्हा तुम्ही जे काही कठोर परिश्रम करत आहात, जे काही प्रयत्न करत आहात ते दिसले पाहिजे. तुम्ही नेहमीच तुमच्या कामाच्या, मित्रांच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे राहायला हवे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!