LIVE STREAM

Accident NewsLatest News

भीषण दुर्घटना! ट्रकने दिलेल्या धडकेनंतर बसला आग; जिवंत जळाले 41 प्रवासी

आतापर्यंत 38 मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान बस ऑपरेटर टूर्सने फेसबुकला एक निवेदन जारी करत जे काही झालं त्याचं आपल्याला फार दु:ख असल्याचं म्हटलं आहे.

दक्षिण मेक्सिकोमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. या अपघातात 41 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. मेक्सिमधील टबेस्को येथील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 48 प्रवासी प्रवास करत होते. बस आणि ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधून प्रवास करमारे 38 प्रवासी आणि दोन चालकांचा मृत्यू झाला आहे. तसंच ट्रक ड्रायव्हरनेही आपले प्राण गमावले आहेत. रॉयटर्सने या अपघाताचे फोटो जारी केले असून, त्यामध्ये तो किती भीषण होता हे दिसत आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर लागलेल्या आगीच बस अक्षरश: जळून खाक झाली आणि फक्त सांगाडा राहिला.

आग पूर्णपणे विझली तेव्हा फक्त तिचे अवशेष शिल्लक राहिले होते. टबेस्कोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आतापर्यंत 38 मृतदेह मिळवण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बसमधून इतर पुरावे गोळा केले जात आहेत. बस ऑपरेटर टूर्स एकोस्टाने फेसबुकवर निवेदन जारी करत अपघाताला दुजोरा दिला आहे. जे काही झालं त्याबद्दल आपल्याला फार खेद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आपण अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून या दुर्घटनेमागे नेमकं कारण आहे, तसंच वेगमर्यादा ओलांडली होती का? याची माहिती घेत असल्याचं सांगितं आहे.

बस ऑपरेटर टूर्स अकोस्टा पुढे म्हणाले, “सार्वजनिक मंत्रालयाने आम्हाला कळवले आहे की कॅम्पेचे येथील कॅंडेलेरिया नगरपालिकेच्या अभियोक्ता कार्यालयात चौकशी केली जाईल, त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या विभागात जावे लागेल.”टॅबास्को सरकारचे सचिव रामिरो लोपेझ म्हणाले की, अधिकारी लवकरच मृतांची संख्या आणि त्यांची ओळख पटवण्याची अंतिम माहिती देतील. स्थानिक नगर परिषद, पॅलासिओ म्युनिसिपल डी कोमलकाल्को यांनी सांगितले की, बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ ठिकाणी नेण्यास मदत होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!