AmravatiLatest NewsLocal News
मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केली १५ वा वित्त आयोगा अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर करीता जागेची पाहणी

आज दिनांक ०८/०२/२०२५ रोजी मा. आयुक्त यांचे आदेशानुसार मा. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचे उपस्थितीत १५ वा वित्त आयोगा अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये मंजुर आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यान्वित करण्याकरीता उर्वरीत ०६ जागांची पाहणी केली व शहरातील विविध भागांमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यान्वित होणार असुन याद्वारे नागरीकांना आरोग्य विषयक विविध तपासण्या करता येणार आहे. सदर जागेची पाहणी करण्याकरीता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षाणधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, मालमत्ता अधिकारी दिपक खडेकार व शहर लेखा व्यवस्थापक कल्पना दुध्याल इत्यादींनी जागेची पाहणी केली.