Latest NewsNanded
सगरोळी येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन: अच्युत गोडबोले यांचा संघर्षकथा, मंत्री उदय सामंतांची शुभेच्छा

- नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी उपस्थिती लावली. तीन सत्रात झालेल्या या संमेलनात मुलाखात, कथाकथन, व कवी संमेलन पार पडले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी आयुष्यात आलेला सुरुवातीचा संघर्ष सांगितला, मुंबईत आल्यानंतर वर्षभरात मी तेरा घर बदली जॉब मिळत नव्हता, 125 रुपये महिन्यांनी रात्रपाळीचे काम केल्याचे ही यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. तर मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पद्धतीने या साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या.