अमरावतीच्या दर्यापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का! शिवसेनेच्या २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अमरावती :- “शिवसेनेच्या ठाकरे गटाला अमरावती जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे! दर्यापुरातील तब्बल २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उबाठाचे आमदार गजानन लवटे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकी काय आहे ही घडामोड?
“दर्यापूर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना, युवासेना, सहकार क्षेत्र आणि शिव सहकार आधी आघाडीच्या तब्बल २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राजीनामे दिले आहेत. यामागील कारण म्हणजे, स्थानिक आमदार गजानन लवटे हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या पदाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या राजीनाम्यांमध्ये पक्षातील अंतर्गत मतभेद, गटबाजी, आणि निर्णय प्रक्रियेत त्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार आहे. स्थानिक स्तरावर नेतृत्वाच्या धोरणांवर नाराजी असल्यानेच हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे दर्यापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर ठाकरे गटाला या भागात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.”
“दर्यापुरात झालेल्या या मोठ्या राजीनाम्यांमुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. स्थानिक नेतृत्वावरच विश्वास नसल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय पावले उचलली जातात? पक्षाचे भवितव्य काय राहील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संदर्भात पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City News!”