“देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट; पुण्यात राज-उद्धव एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण!”

पुणे :- मुबईत एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे पुण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा अर्थाचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
आमचे दैवत खाली बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी एका बाजूला उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे .आणि त्याखाली महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणे काळाची गरज आहे असा आशय असणाऱ्या बॅनरची पुण्यात एकच चर्चा रंगली आहे .पुण्यातील टिळक रोडवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं , अशी बॅनरबाजी पुणेकरांसह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय . विशेष म्हणजे, एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी आज(10 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ही त्यांच्यातली पहिलीच भेट असेल. आगामी महापालिकेच्या अनुषंगाने या भेटीत काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे पुण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी बॅनरबाजी केली जातेय.
राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(सुषमा अंधारे) यांनी राज ठाकरेंचा राजकीय वावर संपत चालला आहे. राज ठाकरे अनेकदा भाजप विरोधात भूमिका घेतात पण निवडणुका जवळ आल्या की भाजप सोबत जवळीक साधताना दिसतात. ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते असं म्हटलंय.