AmravatiLatest News
नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्तम प्रतिसाद
अमरावती :- महापालिका मालमत्ता कर देयकांच्या वसुलीवरती भर देत असून, चालू आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास अमरावतीकरांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. आज दिनांक ०९ फेब्रुवारी,२०२५ रोजी १३ लाख ११ हजार रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या सुचनेप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.