“बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वेळापत्रक: उद्यापासून सुरू!”

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्यापासून सुरु होत आहे. ही परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधित होणार आहे. बारावीच्या या परीक्षेत यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. तसेच ३७ तृतीयपंथी परीक्षा देत आहेत.
राज्यात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विज्ञान शाखेला सात लाख ६८ हजार ९६७ विद्यार्थी आहेत. तीन लाख ८० हजार ४१० विद्यार्थी वाणिज्य शाखेला तीन लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात परीक्षा होणार आहे. महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक नव विभागीय मंडळात परीक्षा होणार आहेत. त्यासाठी नव विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. तसेच हेल्पलाइन सुविधा उपलब्ध देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षेमध्ये वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरणी आढळून येतील. त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळांनी अर्ध शासकीय पत्राद्वारे आव्हान केलेले आहेत. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथक नेमण्यात आले आहे. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे.
मंडळ आणि निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय कारणामुळे प्रत्यक्ष तोंडी परीक्षा प्रकल्प आणि इतर परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर 12,15,17 मार्च रोजी आऊट ऑफ टर्न आयोजित करण्यात आलेला आहे. राज्यात मागील ९ परीक्षा विभागीय मंडळात एकूण ३ हजार ३७६ केंद्र आहेत. त्यातील ८१८ केंद्रावरील केंद्र संचालक बदलले आहेत.