भाजीपाला दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांचे नुकसान

अमरावती :- आजच्या मोठ्या बातमीकडे वळूया—भाजीपाला दरात मोठी घसरण.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली आहे. मात्र, कमालीच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
भाजीपाला दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांचे नुकसान
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. कांदा, लसूण, आलं, टमाटर, साभार यांसारख्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरले आहेत.
कवडीमोल दरात विक्री
सध्या भाजीपाल्याचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
- सांभार : 8 रुपये प्रति किलो
- टमाटर : 50 ते 80 रुपये प्रति करेट (एक करेटमध्ये 28 किलो)
- गाजर : 10 ते 12 रुपये प्रति किलो
- वटाणा : 12 ते 15 रुपये प्रति किलो
- मेथी : 5 ते 8 रुपये प्रति किलो
- कांदा : 12 ते 15 रुपये प्रति किलो
- बटाटा : 16 ते 20 रुपये प्रति किलो
- लसूण : 50 ते 100 रुपये प्रति किलो
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
एक महिन्यापूर्वी भाजीपाल्याचे दर वाढले होते, मात्र आता किंमतीत मोठी घट झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया
बाजारात खरेदीदार कमी असल्याने विक्री मंदावली आहे. एका ठोक व्यापाऱ्याने सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की, “भाजीपाला विक्री होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजी गोरक्षणात पाठवावी लागत आहे.” ही परिस्थिती पाहता पुढील काही आठवड्यांतही दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात दर वाढण्याची शक्यता
फेब्रुवारी महिन्यात भाजीपाल्याची आवक कमी होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा परिणाम दरांवर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, पुढील महिन्यात किंमतीत वाढ होऊ शकते. मात्र, सध्या शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट
भाजीपाला दरात सध्या मोठी घसरण झाली असली तरी, पुढील महिन्यात किंमतीत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अश्याच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज़