LIVE STREAM

AmravatiEducation NewsLatest News

मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते मनपा महादेवखोरी शाळेच्या बालकला महोत्सवाचे उद्‌घाटन थाटात संपन्न

अमरावती :- अमरावती महादेवखोरी परिसरातील मनपा उच्च प्राथमिक शाळा, महादेवखोरी येथे दि. ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान वार्षिक बालकला महोत्सव संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणाऱ्या या तीन दिवसीय बालकला महोत्सवाच्या प्रथम दिवशी सोनल रंगारी सचीव कराटे असो. जि. अम. तसेच रविन्द्र साबळे केंद्रसमन्वयक, दस्तुरनगर, केंद्र क्र.९ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. अडथळ्यांची शर्यत, पोता शर्यत, लिंबु चमचा, लंगडी, बेडूक उडी अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

क्रिडा स्पर्धांसोबतच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला विद्यार्थ्यांच्या माता भगिनी तसेच परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी उद्‌घाटक म्हणून दिप्‍ती ब्राम्हणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महिला सेल (पो.आ.कार्या.) तसेच अध्यक्षस्थानी ऍड. रचना पिंपळगावकर यांची उपस्थिती लाभली. हळदी कुंकु आणि उखाने स्पर्धा पारंपारिक आयोजना सोबतच महिलांचे ज्वलंत विषयावर उद्‌बोधन करण्यात आले. संध्‍या वासनिक शाळा निरीक्षक मनपा अम., सौ. जयश्री देशमुख अध्‍यक्ष जयदिप महिला मंडळ, सौ. विघ्‍ने यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा उत्साहात संपन्न झाला.

बालकला महोत्सवाच्या दुस-या दिवशी आनंद मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी पदार्थाची दुकाने मांडून खरी कमाई केली. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या अनिता गवई, नलिनी पाटील, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून बालकला महोत्सवाचा निसरा हिवस विविध नृत्य, नाट्य-अभिनय अशा सांस्कृतिक कलागुणांनी सजला. मनपा आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी कला महोत्सवाचे उद्‌घाटन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरुन कौतुक केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या मनपा झोन क्र.३ च्या अतिरिक्‍त सहायक आयुक्त दिपिका गायकवाड यांनी महादेवखोरी शाळेतील विद्यार्थ्यांशी आगळेवेगळे भावनिक नाते निर्माण झाल्याचे प्रतिपादन आपल्या व्यक्तव्यातून केले. मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी शिक्षक आणि वि‌द्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी मनपा स्‍थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर यांनी शाळेच्या प्रगतीकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका तथा शाळा निरीक्षक ज्योती बनसोड यांनी केले.

विविध स्पर्धांमध्ये प्राविण्‍यप्राप्त विद्यार्थी तथा माता पालकांना साधना चंदेल मुख्याध्यापिका कस्तुरबा इंग्रजी प्राथ. शाळा, अजय देशमुख, ओमप्रकाश बनसोड, पंकज सपकाळ कार्यक्रम अधिकारी मनपा शिक्षण विभाग, संध्या वासनिक शाळा निरीक्षक, मुख्‍याध्‍यापिका अर्चना रडके, निलिमा गुल्हाने यांचे हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. समारंभाचे सुत्रसंचालन प्रज्ञा ढंगारे व निशा चव्हाण यांनी केले.

बालक‌ला महोत्सवाच्या यशस्वितेकरीता मुख्याध्‍यापिका ज्योती बनसोड, प्रज्ञा ढंगारे, मनिषा बदुकले, सचीन सराड, निशा चव्हाण, चित्रलेखा ननावरे, चंचल हिरडे, मोनाली वानखडे, माला घोरमाडे, सुजाता चव्हाण, मालती घरडे, महेन्द्र खडसे, व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंदा जाधव, उपाध्यक्षा पुजा उकर्डे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्‍यांचे भावविश्व फुलविणारा सोहळा पाहून उपस्थितीच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!