“संभाजीनगरत पिकअप ट्रॉलीला धडक, भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, आगीचा भडका उडाला”

छत्रपती संभाजीनगर :- उभ्या ट्रॅक्टर ट्रोलीला पिकअपनं जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पिकअप गाडीने पेट घेतला. पिकअप गाडीत आगीचा भडका उडाल्यानं चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर, पिकअप गाडीमध्ये उपस्थित असलेल्या दुसर्या व्यक्तीचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्लेबोरगावजवळ घडली आहे.
रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्लेबोरगावजवळ उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप धडकली. या भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गल्लेबोरगाव जवळ हा अपघात घडला असून, तिघंही सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात ५१ वर्षीय विनायक जालिंदर पाटील आणि ३५ वर्षीय दादा साहेब बाजीराव देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. तर, सलीम मुलानी हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील तासगांव येथून मृत विनायक पाटील, दादा साहेब देशमुख आणि सलीम मुलानी हे तिघंही पीकअप वाहन घेऊन मंडप डेकोरेशनचे सामान आणण्यासाठी इंदौर येथे निघाले होते.
महामार्गावरील गल्लेबोरगाव येथील पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्यानं रस्त्याच्या कडेला ट्रोली उभी होती.
या ट्रॉलीला पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपच्या केबिनचा चक्काचूर झाला. ज्यात चालक विनायक पाटील आणि दादासाहेब देशमुख हे दोघेही फसले. यातच वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी पाठीमागे बसलेले जखमी सलीम मुलानी यांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. तसेच देशमुख यांना बाहेर काढले. मात्र, देशमुख यांचा रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. तर, चालक पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.