“हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना उद्योग प्रशिक्षण; सुरेखाताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी महिलांसाठी संकल्प!”
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण.
सुरेखाताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष प्रतिष्ठानचे वतीने संक्रांतीनिमित्त विविध गावांमध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम संपन्न होत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील विविध गावांमध्ये संक्रांतीनिमित्त महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन जवळा शहापूर येथे करण्यात आले. गावातील मंदिरामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना विविध उद्योगाचे मार्गदर्शन करण्यात आले. गावातील कष्टकरी सर्वसामान्य महिलांनी वेळोवेळी सुरेखा ताईंकडे उद्योग निर्मितीची मागणी केलेली होती हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा उद्योग केंद्राचे मार्गदर्शक श्री. नेत्रदीप चौधरी यांनी विविध उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली. गाव पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध कच्च्या मालापासून उद्योग निर्मितीकरिता आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्र, ग्रामोद्योग केंद्र व विविध शासकीय योजनांमधून उपलब्ध अनुदानाविषयी माहिती देण्यात आली. पारंपारिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येत विविध उद्योग सुरू करण्याविषयी संकल्प केला. सर्व महिलांनी श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाकरिता शोभनाताई देशमुख जिल्हा अध्यक्ष रा कॉ सुषमा ताई बर्वे अनुश्री निखिल ठाकरे,कार्याध्यक्ष रंजना पाथरे,तालुका अध्यक्ष वनिता धरपाल ,शुभांगी ठाकरे,वैशाली विधळे, ग्रा.प. सदस्य वंदना चौधरी, ग्रा.प सदस्य अर्चना वानखडे, ग्रा.प सदस्य शारदा विधळे,सुषमा मेश्राम, मीनल अक्षय पाथरे, ज्योत्सना ठाकरे, ममता हिवसे, बबीता मेश्राम,गायत्री ठाकरे, शारदाताई भोकरे, संध्या पाथरे, छोटी सोलव,प्रतिभा घावट,चंदा नवले, मीनाताई ठाकरे, हरीदिनी नवले,अनिता सुळे