AmravatiCity CrimeLatest News
अमरावतीत गाडीत आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह – हत्या की अपघात?”

अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत एका चारचाकी वाहनातून संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नगरमधील होमगार्ड कार्यालय परिसरात बराच काळ उभ्या असलेल्या गाडीतून एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हा मृत्यू अपघाती आहे की हत्या? या प्रश्नाने अनेकांच्या मनात शंका निर्माण केल्या आहेत.
अमरावतीतील फ्रेजरपुरा परिसरात संशयास्पद मृत्यूने शहरात खळबळ उडवली आहे. काँग्रेस नगरमधील होमगार्ड कार्यालयाजवळ गेले काही दिवस उभ्या असलेल्या MH 27 BV 5984 क्रमांकाच्या वाहनाविषयी काही नागरिकांना संशय आला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेव्हा गाडीची तपासणी केली, तेव्हा गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतकाची ओळख अमित आठवले, वय 30, राहणार गगलानी नगर, वडाळी, अशी पटली आहे. त्यानंतर, अमरावती शहराच्या डीसीपी कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस, क्राइम ब्रँच, डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक तज्ञांची टीम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी अमित आठवले याला मृत घोषित केलं.आतापर्यंत हा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला असला, तरी या प्रकरणात संशयाचे धागेदोरे असल्याने पोलीस विविध शक्यता तपासून पाहत आहेत. मृत्यूचा कारण काय आहे? हा घातपात आहे का? गाडीत मृतदेह कसा आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
तर, अमरावतीतील या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नेमकं काय सत्य आहे, हे लवकरच समोर येईल. पोलिसांचा तपास सुरू आहे आणि शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील दिशेने चौकशीला वेग येईल. हा मृत्यू नैसर्गिक आहे का? अपघात आहे का? की हत्या? याचे उत्तर पुढील तपासात स्पष्ट होईल.