Latest NewsNagpur
कठडा नसलेल्या विहिरीत कार कोसळली, 3 तरुणांचा बुडून मृत्यू, नागपूरमधील बुटीबोरीत खळबळ

नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. कार विहिरीत कोसळून तिघा तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. काल (10 फेब्रुवारी) रात्री 11 ते 11:30 दरम्यान रस्त्यालगत कठडा नसलेल्या विहिरीत कार कोसळल्याने तिघेही अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस, स्थानिक नागरिकांनी बचावकार्य रात्रभर सुरू ठेवले. शर्थीचे प्रयत्न करून विहिरीतून कार बाहेर काढण्यात आली, मात्र त्याआधीच तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातावेळी तरुणांपैकी एक कार चालवणे शिकत होता आणि त्यादरम्यान वाहनाचा ताबा सुटला. या घटनेमुळे बुटीबोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने कठडा नसलेल्या विहिरींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.