गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शन व श्रीं चां पादुका दर्शन सोहळा

स्थानिक देवरणकरण येथे श्री संत गजानन महाराज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने श्रीं चां प्रगटदिन महोत्सव -2025 साजरा करण्यात येत आहे. या प्रगटदिन महोत्सवात शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिराचा दर्शन देखावा अमरावतीकर जनतेसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रगटदिन महोत्सव अंतर्गत 13 फेब्रुवारी ते 21 फ्रेबुवारी दरम्यान देवरणकर नगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे ,
दि.13 फ्रेबुवारी रोजी सायं 6 वा विविध मान्यवरांच्या उपस्थित तथा संतांच्या उपस्थित श्री साईबाबा समाधी मंदिरांच्या दर्शन देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी साईबाबा व गजानन महाराज यांची काकडा आरती ,धूप आरती मध्यान आरती व विष्णू सहस्त्रनाम पठन अभिषेक पुजा आरती होणार आहे.यावेळी महोत्सवात दिं 16 फ्रेबुवारी रोजी शिर्डी येथील निमोण गावातींल नानासाहेब निमोणकर यांच्या येथील श्री साईबाबा यांच्या 125 वर्षे पुरातण पादुका तसेच श्री संत गजानन महाराज यांच्या दिनेश कुमार देशमुख यांच्या येथील श्रीं च्या मुळ चरण पादुका प्रगटदिन महोत्सवात 16 फ्रेबुवारी रोजी सायं 6 ते 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध आहेत. तसेच 19 फ्रेबुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.तसेच सुंदर व सुरेख आवाजात भजन महेंद्रसिगं यादव व संच यांचे हस्ते सादर करण्यात येणार आहे ..20 फ्रेबुवारी रोजी श्रीं चां 147 वा प्रगटदिन महोत्सव साजरा करण्यात येत असून त्यावेळी संपूर्ण परिसरात दिप प्रज्वलन करून भव्य महाआरती करण्यात येणार आहे, प्रगटदिन महोत्सवाच्या शेवटी ह.भ.प श्रीहरी महाराज सोनेकर यांचे काल्याचे किर्तन असून सांय 7 ते 11 वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रगटदिन महोत्सव भजन कीर्तन,प्रवचन,तथा अध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात आले आहे.. सदर संस्थेच्या प्रगटदिन महोत्सवाचे अध्यक्ष चद्रंकुमार जी जाजोदिया असून कार्याध्यक्ष पदी चंद्रकांत कलोती व स्वागताध्यक्ष पदी नानकरामजी नेभानानी आहेत..
समस्त अमरावतीकर जनतेने प्रगटदिन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे वतीने करण्यात आले आहे.