मोठ्या जल्लोषात काढली भगवान बालाजीची भव्य रथयात्रा

६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ब्रह्मोत्सवाचा भाग म्हणून अमरावती जयस्तंभ चौकातील श्री व्यंकटेश बालाजी भगवान मंदिरातून सोमवारी भव्य रथयात्रा काढण्यात आली. भगवान श्री वेंकटेश बालाजीची रथयात्रा मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. रथयात्रा शहरातील विविध भागातून भ्रम्हन करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आयोजित रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. सोमवार, १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता रथयात्रा सुरू झाली रथ यात्रा काढण्या आधी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सह आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादी नेते संजय खोडके यांनी विधिवत पूजन केले. जयघोष करीत मोठ्या उत्साहात रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. खत्री कंपाउंड, प्रिया टॉकीज, जयस्तंभ चौक, सरोज चौक, बापट चौक, प्रभात टॉकीज रोड, सबनपुरा पोलिस चौकी, धनराज लेन, सक्करसाठा, जवाहर गेट, चित्रा चौक, जुना कॉटन मार्केट परिसरापासून रथयात्रा काढण्यात आली .
श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात संपले. भगवान श्री व्यंकटेश बालाजीच्या ब्रह्मोत्सवादरम्यान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रथ यात्रेत एड.आर. बी. अटल, सुरेश रटावा, जगदीश छाबडा यांच्यासह विश्वस्त आणि अनेक मान्यवर उपस्थित होते