वैजापूर तालुक्यात 12वी बोर्डाच्या परीक्षेला जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीलाचा अपघात; 5 विद्यार्थी जखमी

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात 12वी बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे . वैजापूरच्या खंडाळ्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्याने मोठा अपघात झाला असून 5 विद्यार्थी जखमी झाले आहेत .या पाच विद्यार्थ्यांपैकी एक तरुण गंभीर जखमी असून इतर चारही जखमी विद्यार्थी बोर्डाच्या पेपरसाठी हजर राहिले . जखमी तरुणाला तातडीने वैजापूरचा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत .
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा राज्यभरात आजपासून ( 11 फेब्रुवारी ) सुरू झाली . सकाळी 11 वाजता राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर बारावी बोर्डाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली .दरम्यान छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
गाडीवरील नियंत्रण सुटले, गाडी पलटी
बारावी बोर्डाच्या परीक्षेला घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरजवळ अपघात झाला .गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली .सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र 5 विद्यार्थी जखमी झाले . या विद्यार्थ्यांमध्ये एकाची प्रकृती गंभीर असून इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे . जखमी तरुणाला वैजापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . सुदैवाने इतर चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली .अपघातानंतर किरकोळ दुखापत झालेल्या चार विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचले . बारावी परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. संपूर्ण वर्षभर कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस निर्णायक असतो. मात्र, खंडाळा गावातील या 5 विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास अत्यंत धोकादायक ठरला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली आणि विद्यार्थी जखमी झाले.
राज्यात 12 बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात
राज्यभरात आजपासून (11 फेब्रुवारी) बारावीची परीक्षा (HSC exam) सुरू होत आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2015 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी राज्यात एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली असून त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. तर यंदा 37 तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. दुसरीकडे ही परीक्षा ‘कॉपीमुक्ती’ व्हावी या अनुषंगाने संबंधीत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर राज्यभरत 271 भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहे.