वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव यांनी दिली विलास नगर, म्हाडा कॉलनी येथे भेट

आज दिनांक ११/०२/२०२५ रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव यांनी विलास नगर म्हाडा कॉलनी येथे भेट देऊन दैनंदिन स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी श्री. माथुरकर यांच्या घराजवळील व मागील नाल्याची तक्रार तपासण्यात आली. तेथे असे आढळून आले की काही ठिकाणी नालीवर अतिक्रमण आहे. ज्या ठिकाणी नालीवर अतिक्रमण नाही त्या नाल्यांची सफाई करण्यात आली व सदर तक्रारीचे निराकरण करण्यात आले. म्हाडा कॉलनीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सदर परिसरातील साफ सफाई करुन कचरा उचलण्यात आला व नाल्यांची सफाई करण्यात आली. तसेच प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेची कामे अधिक काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी सहकार्य करावे व परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु डिक्याव, स्वच्छता निरीक्षक श्री. सैय्यद, सचिन सैनी, सफाई कामगार उपस्थित होते.