अंजनगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या लखाड गावामध्ये 27 वर्षे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना झाली आहे

अंजनगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या लखाड गावामध्ये 27 वर्षे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना झाली आहे . मृतक महिलेचे नाव अर्चना प्रमोद लबडे असे आहे. गळफासाची दोरी कापून मृतक महिलेला उपजिल्हा रुग्णालय अंजनगाव येथे सविच्छेदनासाठी नेण्यात आलं येथे माहेरच्या कुटुंबांनी प्रेत घेण्यास नाकार दिला. मृतक महिलेच्या आईने सांगितले की माझ्या मुलीला मागील पाच सहा वर्षापासून कौटुंबिक त्रास होता तिला वारंवार पैशाची मागणी सासरवाडी चे लोक करत होते यामुळेच तिने आत्महत्या केली म्हणून पहिले सासू-सासरे पती आरोपींना अटक करा नंतरच अंतिम संस्कार करणार. त्यानंतर अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी आरोपींना अटक केल्यानंतर 27 वर्षीय अर्चनाचा हिचा लखाड मध्ये अंतिम संस्कार करण्यात आला यामुळे संपूर्ण लखाड गावात शोक कडा पसरली आहे. अर्चनाला एक पाच वर्षाचा मुलगा व नऊ वर्षाची मुलगी आहे.