अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भीम ब्रिगेड संघटनेचा आत्मदहनाचा प्रयत्न
अमरावती :- “अमरावतीत संतापाचा भडका! तीन वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचारानंतर उपचारात दिरंगाई झाल्याने भीम ब्रिगेड संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मागणी पूर्ण न झाल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. संपूर्ण घटना जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये.
“दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका तीन वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचाराची घटना घडली होती. पीडित चिमुकलीला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारात झालेल्या दिरंगाईवरून भीम ब्रिगेड संघटनेने नाराजी व्यक्त करत, जबाबदार नर्सला निलंबित करण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने आज, बुधवार 12 फेब्रुवारी रोजी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःवर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असून, जर मागणी मान्य झाली नाही, तर शहरात कुठेही आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.”
“अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचारात झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या संघटनेने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेणार? आणि संघटनेच्या मागण्यांना प्रतिसाद मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा city news