आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत होणार बदल, एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी बदलणार नियम

▪️ पालकमंत्री नियुक्तीचा तिढा असतानाच अजित पवारांच्या दालनात शिंदेंच्या आमदारांशिवाय रायगडची डीपीडीसी बैठक, जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे सहभागी तर अदिती तटकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती
▪️ मुंबईत धूसफूस असताना दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एका मंचावर, पवारांच्या हस्ते शिंदेचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने होणार सन्मान
▪️ बँकॉकला निघालेल्या तानाजी सावंतांच्या मुलाला परत आणण्यात मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका, मंत्री मोहोळ यांच्या मध्यस्थीनंतर विमान माघारी
▪️ आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवता येतं का? सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरुन आव्हाडांनी केलेल्या टीकेला सुरेश धस यांचं प्रत्युत्तर
▪️ जिल्ह्यात नियुक्त पालक सचिवांपैकी अकराजण संबंधित जिल्ह्यात फिरकलेच नसल्याचं उघड, पालक सचिवांच्या अनास्थेमुळे कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस संतप्त
▪️ कॉपी करणाऱ्यावर आणि कॉपी पुरवणाऱ्याची आता खैर नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे थेट आदेश
▪️ महाराष्ट्रात आणखी एक उभे राहणार ताज हॉटेल; मुख्यमंत्र्यांनी विनंती करताच ताज ग्रुपची हॉटेल उभारण्याची घोषणा
▪️ एका दिवसात 1400 रुपये वाढले, 10 ग्रॅम सोन्याचा भाव लवकरच 1 लाखांवर जाणार, सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट
▪️ इंडियन प्रीमिअर लीग फायनल ईडन गार्डनवर ; 11 शहरांमध्ये होणार 74 सामने, वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची शक्यता