एका पंधरा वर्षीय मुलाने प्रतिशोध घेण्याच्या उद्देशाने केला जीवघेणा हल्ला

नागपूर :- आता एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूरच्या पारडी पोलिस ठाणे हद्दीत 11 फेब्रुवारीच्या सकाळच्या सुमारास विजय भांडेकर वय वर्ष 50 हे आपल्या घरून निघाले असता, समोर चौकात तिघांनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. जखमीचा मुलगा घटनास्थळी आला असता तिघे आरोपी फरार झाले, जखमीच्या मुलाने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपीना अटक करण्यात आले आहे, आरोपीनमध्ये एक विधी संघर्ष ग्रस्त बालक आहे, त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. आदल्या दिवशी झालेल्या वादाचा प्रतीशोध घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे होते नागपूर शहरातील पारडी पोलिस ठाणे हद्दीतील घटना. रागाच्या आवेशात येवून एक 15 वर्षाच्या विधी संघर्ष ग्रस्त बालकाने हा नियोजित हल्ला केला अशी माहिती प्राप्त झाली आहे. आणखी माहितीसाठी आणि नवीन अपडेट्ससाठी बघत रहा सिटी न्यूज.