गुंगीचे औषध देऊन शिक्षकानेच केला दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार.

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडलीय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे ही घटना घडली आहे. नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. आणि तिच्या वर बलात्कार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी या शिक्षकाने दिली. तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून वारंवार विद्यार्थिनी वर बलात्कार केला. सदरील विध्यार्थ्यांनी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात देखील करण्यात आल्याची माहिती आहे. ही माहिती घरच्यांना समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपी शिक्षका विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.