“नागपूरमध्ये अवैध अमली पदार्थांसह दोन आरोपींविरुद्ध मोठी कारवाई!”

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक 3 च्या पथकाने अवैधरित्या अमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी करत त्याला अटक केली आहे.
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महत्त्वाची घटना घडली आहे, जिथे पोलीस विभागाने अवैधरित्या अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कारवाई केली. या घटनेतील मुख्य आरोपी अभिषेक उर्फ दादू मोतीलाल राजने (वय 27) आणि सारंग सुरेश उघडे यांच्या ताब्यातून 30 ग्रॅम मॅफेड्रीन पावडर, एक रेडमी कंपनीचा मोबाईल, तसेच एक ‘एसेस’ कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
आरोपी अभिषेक राजने आणि सारंग उघडे हे नंदनवन झोपडपट्टी आणि कर्नलबाग या परिसरांमध्ये राहत होते, आणि ते अवैधपणे अमली पदार्थ बाळगून नागपूरच्या विविध भागात हे माल विकत होते. पोलीस निरीक्षकांची माहिती असताना, हे आरोपी जुना बगडगंज हरीश किराणा स्टोअर्सच्या समोर रोडवर एकत्र आले होते, तेव्हा पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांचे ताब्यातील 2,15,000/- रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला. पोलीस ताब्यात घेतल्यानंतर आरोपी अभिषेकने सांगितले की, त्याने मॅफेड्रीन पावडर हे सारंग उघडे याच्याकडून घेतली होती. या प्रकरणात सारंग उघडे फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला आहे.